About Us

नमस्कार वाचक रसिक मंडळी,penruns वर आपले सहर्ष स्वागत!!
नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःला सिद्ध करता करता मनावर आणि अर्थातच त्यामुळे शरीरावर, आपल्या आरोग्यावर एवढा ताण येतो की त्या तणावापासून दूर जाताना कधी कधी आपण त्या तणावाखाली अजून दबले जातो.
दिवसातले २४ तास देखील कमी वाटू लागतात.मनात खूप काही साचून राहतं आणि ते वर्षानुवर्षे तसचं राहतं.मग या मनाला मोकळे करण्यासाठी गृहिणी मालिकांचा आधार घेतात नायिकेच्या सुखदुःखात सहभागी होतात.तर काही मंडळी नवनवीन पुस्तके वाचून स्वतःचं मन रमवतात,स्वतःला व्यस्त ठेवतात.लहान मुले तंत्रज्ञानाच्या आहारी जात व्हिडिओ गेम्स कडे वळतात.
गेल्या काही वर्षात बसने प्रवास करता करता अशी खूप पात्र आम्हाला मिळाली;जी स्वतःचं जीवन दुसरं कोणाचं होऊन जगताना आम्हाला दिसली.स्वतःचं मन कधी कोणाकडे मोकळे न करता दुःखाचा आवंडा गिळून फक्त आणि फक्त पुढे चालत राहणारी.
स्वतःचं दुःख कुठेतरी कागदावर लिहून कागद जाळून टाकणारे,आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणारे घट्ट मजबूत ,मनाचे लोक.
अशीच वेगवेगळी पात्रे आपण आपल्या penruns या कलाकृतीतून साकारण्याचे प्रयत्न करत आहोत.
आपला पेन इतका सुसाट सुटलाय की त्याला रोज काहीना काही पात्रे भेटतच असतात.एकच कलाकार अनेक पात्रं साकारताना दिसतो.आणि स्वतःच्या खूप नवनवीन कथा जगासमोर सादर करतो.या कलाकारांना बघून त्यांची तळमळ जाणून घेत त्यांचीच एक छोटीशी पण खूप काही सांगून जाणारी;तुम्हाला – आम्हाला आपलीच वाटणारी सुखदुःख या पेज वर सादर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न penruns च्या माध्यमातून आम्ही करत आहोत.
आमचे लेख वाचताना आपल्याला देखील या गोष्टी अपल्याशा वाटतील,मनाच्या जवळच्या वाटतील ही अपेक्षा.
धन्यवाद!