MARATHI STORY

MARATHI STORY भाग एक इथे वाचा रिया ला तेजस्वी पेक्षा जास्त गुण आहेत हे बघून रिया सोडून क्लास मध्ये बाकी कोण खूश नव्हते.रिया स्वतःचे गुण बघून खूप खूश होती आणि आजूबाजूला बघते तर सगळे एकदम शांत झाले होते. जस की काही दुर्घटना घडली आहे किंवा काही दुःखद बातमी आहे.आतापर्यंत निकाल लागल्यावर सगळ्या मुली ताईंसाठी काही ना काही घेऊन येत होत्या म्हणून रिया ने सुद्धा ताईंसाठी कॅडबरी आणली होती.

रिया ताईंना कॅडबरी देण्यासाठी व ताईंचा आशीर्वाद घेण्यासाठी गेली असता कस्तुरी पटकन मध्ये बोलली.मला काही ही कॅडबरी अजिबात आवडत नाही.ही गोष्ट रिया च्या मनाला लागली.रिया चे मन राखायचे म्हणून वर वर च्या मनाने का होईना ताईंनी कॅडबरी आवडत असल्याचे सांगितले.रिया ला हळूहळू या सर्व गोष्टींचा इतका त्रास व्हायला लागला की रिया स्वतः ला कुरूप,अपात्र समजू लागली.रिया चा आत्मविश्वास डगमगू लागला.कधी कुठे काय बोलावे हे कळेनासे झाले.

एकदा असच क्लास चालू असताना एक विचित्र गोष्ट घडली.रिया खोली च्या दाराजवळ बसली होती.बाकी मुलींचा सराव चालू असेपर्यंत ताईंनी रिया च्या बॅच ला थोडा वेळ बसवलं होतं.MARATHI STORY क्लास चालू असताना ताईंचा मुलगा सूरज अधूनमधून काही कामानिमित्त क्लास मध्ये येत असे. तसाच तो त्यादिवशी पण आला होता. ताईंचे आणि सूरज चे बोलणे झाले आणि सूरज आता निघणारच तर अचानक क्लास एकदम शांत झाला आणि सगळ्या मुली आणि ताई रिया कडे बघू लागल्या.

MARATHI STORY
MARATHI STORY

रिया ला मागून कोणीतरी डोक्याला स्पर्श केल्याची जाणीव झाली.क्षणभर रिया चे शरीर एकदम गरम पडले,एकदम लाल लाल झाली होती रिया.रिया ला आपली खिल्ली उडवली असल्याचं लक्षात आलं होतं.रिया ला खूप अपमानास्पद वाटलं,आणि राग पण आलेला पण घडलेल्या प्रकाराला काय प्रत्युत्तर द्यायचे हे रिया ला कळत नव्हतं.आणि पुन्हा एकदा रिया काहीच न बोलता शांत पणे सहन करत बसली.क्लास मधल्या सगळ्या मुली रिया ची गंमत बघत होत्या.आणि एकमेकींच्या कानात रिया बद्दल काहीतरी पुटपुटू लागल्या.

असं काय झालं होतं ज्यामुळे रिया ला या गोष्टी सहन कराव्या लागत होत्या हे रिया ला कितीही प्रयत्न करून सुद्धा कळत नव्हते.
काही दिवसांनी रिया च्या एका काकांनी(वडिलांच्या मित्रांनी) रिया ला एका कार्यक्रमात नृत्य सादरीकरणासाठी विचारलं होतं.मग त्यासाठी रिया तयारी करु लागली. सगळ झालं पण रिया कडे ती शिवलेली साडी नव्हती जी की पारंपरिक रित्या सादरीकरणासाठी वापरली जाते.रिया च्या आईने ताईंना साडी साठी विचारले असता ताईंनी पण होकार दिला.

MARATHI STORY

ज्यादिवशी रिया आणि आई साडी घेण्यासाठी ताईंकडे गेल्या,साडी कपाटातून बाहेर काढेपर्यंत ताईंनी रिया ला घरातली १-२ कामं सांगितली.ताई आपल्यासोबत एवढं प्रेमाने बोलत आहेत हे बघून भारावून गेलेल्या रियाला लक्षात आलं नाही,की बाकी मुलींना ताईंकडून मनापासून वस्तू वापरायला मिळतात पण आपल्याला काहीतरी मूल्य मोजावे लागते.रिया च्या आई ला लक्षात आले होते;पण तरीही त्यांनी दुर्लक्ष केले.

रिया आता दहावीला गेली होती,दहावी मुळे अवघड विषयांसाठी रिया ला शिकवणी लावली होती.त्यामुळे आता ताईंच्या क्लास ला जाणं रिया ला जमत नव्हतं.त्यामुळे रिया ने एक वर्षासाठी क्लास ला जाणे थांबवायचे ठरवले.दहावी झाली,मग लगेच अकरावी बारावी मग कॉलेज असं करत करत एक वर्षाचा गॅप वाढत जाऊन आठ वर्षांचा झाला.

एक दिवस अचानक रिया ने ताईंना फोन केला आणि क्लास बद्दल चौकशी केली.फोन वर बोलताना आपण ताईंच्या लक्षात आहोत याचेच रियाला आश्चर्य वाटले.
रिया शनिवार-रविवार क्लास ला जाऊ लागली. अजून काही छान छान गोष्टी

एक महिना झाल्यावर ठरल्याप्रमाणे रिया ने ताईंना त्यांची फी ७००/- सुद्धा दिले.
अजून एक- दोन महिने झाल्यावर हळू हळू काही नवीन मुलींसोबत रिया ची ओळख होऊ लागली.इतक्या वर्षांनी रिया मुलींच्या बाबतीत नशीबवान होती.यावेळेस ज्या मुलींशी रिया बोलायची त्या मुली लहानपणी रिया सोबत शिकणाऱ्या मुलींपेक्षा स्वभावाने खूप छान होत्या.वयाने लहान असल्या तरी क्लास मध्ये गॅप न झाल्यामुळे रिया पेक्षा नृत्यामध्ये त्या अनुभवी होत्या.त्यांच्या पुढच्या परीक्षा देखील झाल्या होत्या.

एकदा असच सगळे एकत्र बसले होते तेव्हा बोलता बोलता विषय निघाला आणि रिया ने ताई आणि अनुजा चे बोलणे ऐकले त्यावरून रिया ला कळाले की,आपल्याकडून फी जास्त घेतली जातीय.आणि फक्त एवढेच नाहीतर वर्ष न वर्ष मुली फी देत नाही.म्हणजे रिया एवढी प्रामाणिकपणे वेळच्या वेळी फी देत असूनही ताईंना तिची किंमत नव्हती.वयाने लहान असल्या तरी नृत्या मध्ये रिया पेक्षा पुढे होत्या.आणि त्यानुसार त्यांची फी जास्त पाहिजे होती.पण रिया ची फी जास्त होती.ही गोष्ट रिया च्या लक्षात आली.मग पुढच्या महिन्यात फी देताना रिया ने देखील आधीचे पैसे वळती करून घेत ताईंना कमी फी दिली. MARATHI STORY

मग लगेच पुढच्या महिन्यात ताईंनी सगळ्यांना एकत्र फी वाढवल्याचे सांगितले.
रिया सरावाच्या वेळेस स्वतःला नृत्या मध्ये पूर्णपणे झोकून देत असत,पाहिजे त्यानुसार आखीवरेखीव नृत्यकृती करत,हावभाव एकदम मनापासून चेहऱ्यावर खेळवत.ताई या सगळ्या गोष्टी बघत आणि आता रिया चे कौतुक पण होऊ लागले.एकदा ताईंनी असच एका लहान मुलीचा डान्स बसवायला सांगितलं,ते पण काम रिया ने मनापासून पूर्ण केलं.

आणि अगदी त्या मुलीला पाहिजे तशी छान रचना करून दिली.आणि त्या कामाचे रिया ला चांगले पैसे देखील मिळाले.नंतर अजून एका मुलीचा कार्यक्रमासाठी डान्स बसवण्याचे काम रिया ला मिळाले.ते काम चालू असतानाच ताईंनी रिया ला विचारलं संस्कृती चे आई बाबा तुला कामाच्या पैशांबद्दल काही म्हणले का म्हणून.आता पुढे काय होणार आहे वगैरे रिया च्या ध्यानीमनी नव्हते अजिबात.आणि रिया ने सरळ साधं उत्तर देऊन टाकलं काही बोलणे झालं नाही असं.

संस्कृतीचे काम पूर्ण झालं आणि ताई रिया ला म्हणाल्या की संस्कृतीचे आई बाबा फी देणार नाही म्हणले कारण आपण एवढं काही काम केलं नाहीये ना…रिया ला प्रश्न पडला एवढे दिवस आपण एवढं दगदग करून काम केलं आणि असं कसं काय लोक वागू शकतात.
मग त्यानंतरच्या शनिवारी संस्कृती ने रिया ला कॅडबरी आणून दिली.आणि मग रिया ला झालेला प्रकार लक्षात आला.रिया च्या मेहनतीवर ताईंनी कमाई केली होती आणि बरोबर वाटत नाही म्हणून रिया ला एक कॅडबरी दे असं संस्कृती ला सांगण्यात आलं.

MARATHI STORY
MARATHI STORY

रिया चा होतकरू पणा बघून ताईंनी एक दिवस रिया ला विचारलं मला क्लास चालवण्यासाठी मदत करशील का? ताईंचे इतर ठिकाणी देखील क्लासेस चालू होते. इतर दोन ठिकाणचे व ताईंच्या मूळ पहिल्या-वहिल्या क्लास मधील देखील क्लासेस ताईंनी रिया ला घ्यायला सांगितले.त्याचा मोबदला म्हणून रिया ला तिची स्वतःची फी माफ होती.रिया ला पण खूप छान शिकायला मिळत होते.त्या क्लास सोबतच एक मुलगी होती श्रेया जीचा खाजगी क्लास घ्यायचा होता तिच्या घरी जाऊन.श्रेया ला शिकवणे म्हणजे एक कसोटी च होती.रिया ने पूर्ण एक महिना काम केलं आणि नंतर ताईंना सांगून क्लास घेणं बंद केलं.श्रेया च्या क्लास चे रिया ला एकूण फी पैकी निम्मी फी मिळणार होती.

आता परत काही दिवसांनी परीक्षा होत्या म्हणून आता परत परीक्षेची तयारी सगळ्यांची गडबड चालू झाली.रिया पण पाचव्या म्हणजेच मध्यमा पूर्ण परीक्षेला बसली होती.क्लास घेणे सोबत स्वतःची तयारी असं सगळं चालू होते.अधून मधून ताई श्रेया चा विषय काढून रिया ला सांगत की अजून त्यांनी(श्रेया च्या आईने) मला फी दिली नाही अगं.रिया ताईंवर विश्वास ठेवत प्रत्येक वेळेस ताईंचे ऐकून विषय सोडून द्यायची. MARATHI STORY

लहान मुलींच्या पालकांना आपापल्या मुलींचे परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मदतीची गरज होती.त्यासाठी ताईंनी मग काही जवळच्या मुलींना मदत करायला सांगितली. त्यामध्ये शिवन्या,रुचिका, आदिती या मुली होत्या.ताईंनी तिघींना स्वतःचे डेबिट कार्ड दिले आणि मुलींचे फॉर्म चे काम फी सोबत पूर्ण करण्यास सांगितले.पण एवढं सगळं करून पण एक मुलगी राहिलीच पण नेमक्या शिवण्या,रुचिका,आदिती त्यावेळेस उपलब्ध नव्हत्या मग ताईंनी हे काम रिया ला सांगितले.रिया ने ताईंना फी कशी भरायची हे विचारलं कारण शिवन्या,रुचिका,आदिती या तिघी ताईंच्या कार्ड ने भरणा करत असल्याचं रिया ला माहीत होतं.पण ताई म्हणाल्या आता तू फी भर नंतर पालकांकडून घे.सांगितल्याप्रमाणे रिया ने फॉर्म चे काम पूर्ण केले.

आणि संबंधित पालकांना त्याबद्दल सांगितलं.काम होइपर्यंत पालकांचे सारखे एकावर एक फोन रिया ला येत होते.आणि जेव्हा संध्याकाळी काम पूर्ण झाल्याचं पालकांना समजलं त्यानंतर मग पैसे पाठवते वगैरे असा एक ही मेसेज रिया ला आला नाही.पण लगेच पैसे मागायला नको म्हणून रिया थांबली.एक आठवडा झाला अजून ही रिया ला काही पैसे मिळाले नव्हते.

MARATHI STORY

रिया ला वाटलं ताईंकडे पैसे दिले असतील म्हणून आपल्याला काही मेसेज आला नाही.वाट बघून रिया ने ताईंना पैशांबद्दल विचारलं.ताई म्हणाल्या तू परस्पर त्यांच्याकडून पैसे घे.मला त्यांनी पैसे दिलेले नाहीत.हे ऐकून मात्र रिया चांगलीच भडकली. एखाद्या माणसाने आपले काम केले असेल तर त्याला त्याचे पैसे वेळेतच द्यावे ही साधी गोष्ट कळू नये का या लोकांना? असा विचार तिच्या मनात आला.आता असंही एवढे दिवस उलटून गेले होतेच त्यामुळे रिया ने त्या मुलीच्या पालकांना (आईला) पैशांची मागणी केली.आणि त्यानंतर आलेल्या त्यांच्या प्रतिसादाला बघून रिया एकदम चकितच झाली. मनोरंजनाची दुनिया

कारण आता काम झाल्यामुळे रिया च्या पैशांना काही किंमत नव्हती.त्या म्हणाल्या अरे हा देते लक्षात नव्हतं…आता जमणार नाही पुढच्या महिन्यात ५ तारखेला नक्की देते.पुढच्या महिन्याची ५ तारीख आली तरी पैशांचा काही पत्ता नव्हता.आज देते उद्या देते चालूच होतं.आणि रिया चे पैसे थकवून त्यांचे मात्र मस्त हॉटेलिंग वगैरे चालू होते.आता मात्र रिया भडकली आणि तिने कायदेशीर पावले उचलण्याचा निर्णय घेत त्यांना सूचित केलं.मग त्यांनी ताईंना संपर्क केला आणि रिया ची तक्रार केली.

दुसऱ्या क्षणीच ताईंचा रिया ला फोन आला.रिया तू पालकांकडे पैसे मागितले का? अगं देतील ते पैसे तुझे त्यांना पैशांची अडचण आहे माहिती आहे मला.इतके दिवस शांत बसणारी,समजून घेणारी रिया आज फार चिडली होती.ताईंना तिने(रिया ने)विचारलं मला पण पैशांची अडचण आहे त्याचं काय मग?
कालपरवा त्या पालकांविषयी मांडलेल ताईंच मत आज पुर्णपणे बदललेल होतं.ताई आणि रिया चं बोलणे झालं होते तेव्हा ताई म्हणाल्या होत्या की ते लवकर पैसे देत नाही माझे पण फी चे पैसे थकवतात.
ते लोक पैसे वाले होते आणि ताईंना त्यांच्याकडून फायदा होता म्हणून रिया चे महत्त्व ताईंखेरीज अगदी शून्य होते.क्लास मध्ये ये आपण बोलुयात असं ताई वारंवार रिया ला सांगू लागल्या.आणि एवढ्या वर्षांच्या अनुभवातून रिया एवढं नक्कीच शिकली होती की आपल्याला दिली जाणारी वागणूक आणि त्यामागील हेतू याचा विचार करता आता आपण काय पाऊल उचलावे.

आत्तापर्यंतचा रिया चा नृत्य प्रवास वाटेल एवढा सोपा नक्कीच नव्हता,पण काय झालं असेल पुढे?
लवकरच येत आहे भाग ३
धन्यवाद!!!

MARATHI STORY