MARATHI STORY रिया ला माहीत होतं क्लास मध्ये गेल्यावर सगळ्या मुलींसमोर आपला अपमान होणार आहे.आणि उच्च वर्गातील लोकांसोबत कसे वागावे उठबस करावी याची शिकवण दिली जाणार होती.आणि पुन्हा एकदा आपल्याला आपली जागा दाखवली जाणार होती. त्यामुळे रिया ने स्पष्ट पणे क्लास मध्ये येण्यास नकार दिला.भाग एक इथे वाचा
त्यावर ताई रिया ला म्हणाल्या त्यांचे पैसे मी देते तुला.श्रेया च्या आईने अजूनही फी दिली नाही असं वारंवार सांगणाऱ्या ताईंनी आज दुसऱ्या मुलीचे पैसे स्वतः देण्याची तयारी दर्शवली पण श्रेया चे पैसे कधी पण स्वतःहून रिया ला दिले नव्हते.अजून मला पैसे मिळालेच नाही असं म्हणत वेळ काढत बसल्या.खर तर श्रेया च्या आईकडून झाला होता उशीर पण मग दुसऱ्या मुलींचे पैसे भरून तुम्ही त्यांची बाजू सावरून घेताय मग माझी परिस्थिती माहीत असूनही अजून श्रेया चे पैसे स्वतः का नाही मला दिले असा विचार रिया च्या मनात सारखा येत होता.
रिया ने देखील ताईंना तडकाफडकी सांगून टाकले ठीक आहे तुम्ही मला श्रेया चे पैसे द्या आणि हे बाकी पैसे आहेत ते मी त्या पालकांकडून घेते.ताई काही या गोष्टीला तयार होत नव्हत्या. MARATHI STORY
सारखे एकावर एक फोन चालू होते, मेसेजेस चालू होते.आता प्रकरण ताईंच्या हाताबाहेर गेल्यामुळे ताईंनी वैतागून रिया चा नंबर ब्लॉक केला त्यामुळे रिया त्यांना मेसेज करू शकत नव्हती.आणि हा जो काही प्रकार घडला होता त्याने रिया च्या सामंजस्याची आणि सहन करण्याच्या शक्तीचा अंत गाठला होता.
त्यामुळे आता रिया सुद्धा काही एक ऐकायला तयार नव्हती.खूप साऱ्या वादानंतर शेवटी ताईंनी रिया ला श्रेया चे थोडेफार पैसे दिले आणि परीक्षेच्या फॉर्म चे पूर्ण पैसे दिले आणि विषय संपवून टाकला.
रिया ने झाल्या प्रकारामुळे क्लास सोडला आणि बहुतेक रिया चा डान्स पण कुठेतरी हरवला.रिया तिच्या जीवनातील एका अशा वळणावर येऊन पोहचली होती की तिला तिचा आत्मसन्मान आणि तिची आवड या मधील एक निवडायचं होतं आणि तिने तिचा सन्मान निवडला.
प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःची एक अशी जवळची काही तरी गोष्ट असते जी त्याला खूप प्रिय असते.त्या गोष्टी सोबत त्याचे सुख दुःख थोड्या फार प्रमाणात का होईना जोडलेले असते.
जेव्हा जवळची माणसे पण समजून घ्यायला,मन मोकळं करायला जवळ नसतात त्यावेळेस त्या गोष्टीला भेटलं तिच्यासोबत वेळ घालवला की खूप हलकं वाटतं.
लहानपणापासून रिया ने ऐकलं होतं शिक्षणासोबत माणसाच्या अंगी कला देखील पाहिजेच.कलेची साधना स्वतःची स्वतः सोबत नव्याने ओळख करून देते.
नृत्य कला साकारताना शरीराच्या होणाऱ्या हालचाली,त्या हालचाली करताना लागणारा शरीराचा कस,चेहऱ्यावरील हावभाव या गोष्टींचा समतोल राखत असताना फक्त शरीराचाच व्यायाम होत नसतो तर आपल्या मानसिक आरोग्याची देखील एक प्रकारे ती तालीम असते.त्याच प्रकारे गायनाचा सराव किंवा रियाज करताना आवाजातील चढ उतार त्यासोबत श्वासाचे नियंत्रण या सगळ्या गोष्टींची कसोटी लागते आणि त्यातून एक छान कला सादर होत असते.
MARATHI STORY
नृत्य कलेचा सराव करताना येणारा घाम आणि तरीपण आपल्या कलाकृती मध्ये संपूर्ण पणे दंग होऊन स्वतःला झोकून देणे या सर्व गोष्टींमुळे चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते.शारीरिक थकव्यासोबतच मानसिक थकवा देखील दूर होतो.आणि मन प्रसन्न,टवटवीत होते. मनामध्ये नवीन आशा आकांक्षा जाग्या होतात.नवीन ध्येय बांधली जातात आणि ती पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल चालू होते.
रसिक वाचकहो रिया चा नृत्याचा प्रवास थांबला खरा,पण या सर्वांचा तिच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला.
या अगोदर लहानपणापासून शिकत असताना रिया ने अनेकदा तिच्या नृत्य शिक्षणात खंड पाडला होता,आता शेवटी तर ती ताईंकडे तब्बल १२ वर्षांनी गेली होती.
पण पुन्हा एकदा तिथे तिचा अपमान झाला होता,तिला वेगळी वागणूक मिळाली होती.त्यामुळे रिया खूप दुखावली गेली होती.
रियाला कधी जवळचं न मानलेल्या ताईंवर,स्वतः वर,आईवर,बाबांवर रिया खूप नाराज होती.आता पर्यंत रिया च्या नृत्य प्रवासातील ताईंची भूमिका तर आपल्याला स्पष्ट झाली;पण कधी कधी माणूस आपल्या जवळच्या माणसांकडून पण दुखावला जातो तसं झालं होतं रियाच.
शास्त्रीय नृत्य शिकताना रिया सोबतच्या बाकी मुली काही इतर नृत्य प्रकारात देखील स्वतःला तासून काढत होत्या.जसे की काही लोकनृत्य प्रकार.पण रिया च्या आई चे म्हणणे होते की रिया ने फक्त आणि फक्त शास्त्रीय नृत्यच शिकावे.रिया तर असंही लहान होती त्यामुळे तिला या गोष्टींची समज नव्हती ती फक्त आई म्हणते तेच बरोबर तसच करायचं असा विचार करत होती.आणि आई ला देखील हे समजत नव्हते की नवनवीन गोष्टी सतत करत राहायला पाहिजे.त्यामुळे बुध्दीला चालना मिळते,नवीन गोष्टींची जुन्या गोष्टींशी छान सांगड घालता येते.
त्यामुळे कुठेतरी रिया त्या नवीन गोष्टी शिकण्यापासून लांब राहिली. मनोरंजनाची दुनिया
१२ वर्षांच्या अंतरा नंतर देखील रिया जेव्हा पहिल्यांदा क्लास ला गेली होती त्यावेळेस अगदी क्वचितच ती एखाद्या नृत्य कृतीमध्ये चुकायची,नाहीतर एवढ्या वर्षांनी सुद्धा तिला सगळं आठवत होतं.कारण नृत्याने तिला कधीच सोडलं नव्हतं,विरंगुळ्यासाठी गाणी गुणगुणताना पण रिया सगळी नृत्याशी संबंधित शिकलेल्या प्रकारांचीच गाणी म्हणत असे.
क्लास सोडताना झालेल्या प्रकारात रिया ची चूक नसताना देखील रिया ला ऐकून घ्यावं लागणार होतं,जे की तिला मान्य नव्हतं,पण रिया च्या बाबांचा क्लास सोडण्याच्या निर्णयाला विरोध होता.कारण त्यांचे स्वप्न होते जे की मोठे होणे,नाव कमावणे आणि रिया ने जर क्लास चालू ठेवला असता तर त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले असते असा त्यांचा भ्रम होता.पण खरतर ही गोष्ट कधी होणारच नव्हती याची खात्री रिया आणि आईला होती.कारण आतापर्यंत समान संधी रिया ला कधी मिळालीच नव्हती.रिया च्या चांगल्या,समजूतदार स्वभावाचा फक्त फायदाच घेतला गेला होता. MARATHI STORY
क्लास बंद झाल्यानंतर रिया मानसिक रित्या खूप त्रासलेली होती.कोणत्याच गोष्टीमध्ये तिला आनंद वाटत नव्हता.काही नवीन गोष्ट करण्याची इच्छा होत नव्हती.एक दिवस असच फोन बघताना काही मुलींचे भरतनाट्यम चे व्हिडिओज रिया ने बघितले,आणि रिया च्या अंधारलेल्या मनात परत कुठेतरी एक आशेचा किरण डोकावू लागला.आणि पुन्हा एकदा नृत्याने आपली साथ सोडलेली नाही याची जाणीव रिया ला झाली.
रिया पुन्हा नवीन क्लास शोधायला लागली,पण तिला ना एक सवय झाली होती.काटेकोर शरीर रचना,नृत्य सादरीकरणाची त्यामुळे नवीन कोणाकडे तसेच शिकायला मिळेल का याबद्दल तिला शंका होती.
एकदा असच बाबांच्या कोणा मित्राच्या मुलीचं अरांगेत्रम(भरतनाट्यम पूर्ण आत्मसात केल्यानंतर, कला जोपासण्याची कला अवगत झाल्यानंतर गुरू आपल्या शिष्याला पुढील वाटचालीस जसे की शिष्य आता पारंगत झाल्यामुळे स्वतः शिकवू शकतो यासाठी परवानगी देतात.आणि पूर्ण शिक्षणामध्ये आतापर्यंत शिकलेल्या कलेचे नृत्य नाट्यमय सादरीकरण हे अरांगेत्रम होते.) होते.त्यावेळेस बाबांनी रिया ला तिने क्लास सोडल्याची आठवण करून देत नाराजी दर्शवली.
या सगळ्या गोष्टींमुळे रिया ला भीती वाटू लागली की ती कधी डान्स विसरली तर,तिला कधीच काही आठवले नाही तर?असे अनेक प्रश्न रिया ला वारंवार सतावू लागले.
रिया ला काही करावेसे वाटत नव्हते,मानसिक रित्या रिया खूप खचलेली होती.तिच्यासोबत काय होतंय याबद्दल तिलाच माहीत नव्हतं.आतापर्यंत नीटनेटके राहणारी रिया आता खूप आळशी झाली,एक एक दिवस अंघोळ करत नव्हती ना कुठे येणे जाणे,कोणाशी बोलणे.सारखं घरात बसून राहायची,कुठे जायचं विचारलं की पण या त्या कारणाने टाळाटाळ करत असे.
आणि वाईट गोष्ट अशी की,तिला होणाऱ्या या त्रासाबद्दल घरात कोणालाच कल्पना नव्हती.कारण घरातील कामं वगैरे करणे हे तिचं नित्य नियमाने चालू होते.आणि स्वतः रिया ला देखील माहीत नव्हतं की ती डिप्रेशन मध्ये गेलीय.
एक दिवस असच फोन वर मुलाखतीचे व्हिडिओज बघताना एका अभिनेत्रीची मुलाखत तिने बघितली त्यामध्ये त्या अभिनेत्रीने देखील डिप्रेशन विषयी भाष्य केले होते.तिच्या बोलण्यात आणि स्वतःच्या दैनंदिन जीवनात रिया ला साम्य जाणवले.आणि रिया एकदम हादरली कारण त्यावेळेस तिला कळलं की ती डिप्रेशन मधून जातीय.पहिल्यांदा हे कळताच रिया ला खूप वाईट वाटलं, टपकन डोळ्यातून पाणी देखील आले.
पण त्या अभिनेत्रीचा पूर्ण प्रवास ऐकून कुठेतरी रिया मनोमन स्वतःला सांगत होती की मी सुद्ध यातून नक्कीच बाहेर पडू शकते.रिया ने विचार केला लगेच कुठे दुसरा क्लास मिळेलच असे पण नाही किती दिवस याच गोष्टीवर आपण पण अडकून राहायचं.
पुन्हा एकदा नव्याने सुरुवातीपासून रिया ने सुरुवात केली.रोज सकाळी सरावाला लवकर उठायची छान व्यायाम करून नृत्य सराव करू लागली.बाहेर मैत्रिणींना भेटू लागली,फिरायला जाऊ लागली.हळूहळू नृत्य दिग्दर्शनाची कामे तिला मिळायला लागली त्यातून चांगली कमाई होऊ लागली.आणि हे काम करत असतानाच रिया इतके दिवस ज्या गोष्टीची वाट बघत होती ती गोष्ट म्हणजे एक मार्गदर्शक एक गुरू अखेर तिला मिळाले.
MARATHI STORY भाग दोन इथे वाचा
आणि पुन्हा एकदा नृत्याचा प्रवास यशस्वीरीत्या चालू करून रिया यशस्वी झाली होती.
नृत्याच्या माध्यमातून खूप प्रसिद्धी मिळवणे,नृत्य क्षेत्रात कुठेतरी एकदम उंचावर जाऊन पोहचणे हे ध्येय रिया चे कधीच नव्हते.तिला फक्त तिचा नृत्य प्रवास अविरतपणे चालू ठेवायचा होता.कलेच्या साधनें मध्ये तिला कोणताही व्यत्यय,अडथळा नको होता.तिला फक्त आणि फक्त एक यशस्वी साधक व्हायचं होतं.कारण फळाची अपेक्षा न ठेवता जेव्हा अनपेक्षितपणे फळ मिळते हे तिने एकदा अनुभवलं होतं,आणि त्याची किंमत तिला माहित होती.त्यामुळे तिच्या आता काहीच अपेक्षा नव्हत्या.तिला फक्त बेधुंद होऊन सुरांवर स्वतःला झोकून द्यायचं होतं,जे की ती आता रोज करत होती.आणि खूप खूश होती.
काय मग वाचक रसिक आवडली का तुम्हाला रियाची गोष्ट संघर्षातून यशाकडे?
आयुष्याचा आनंद काहीतरी मोठी गोष्ट करून दाखवण्यातच असतो असं नाही तर खूप साऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद आणि समाधान आपण शोधलं पाहिजे,स्वतःच स्वतःची मदत केली पाहिजे,सर्वांनी आपल्याला स्वीकारलेच पाहिजे,आपण सर्वांना आवडलोच पाहिजे हा अट्टहास नसावा या गोष्टी आपण रिया कडून शिकलो.
लवकरच भेटुयात नवीन गोष्टीसोबत.. तोपर्यंत आनंदी राहा,खूश राहा,वाचत राहा,आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अखंडितपणे स्वतःवर काम करत राहा.
धन्यवाद!!!
MARATHI STORY