TRUE FRIENDSHIP STORY

TRUE FRIENDSHIP STORY मैत्री हा शब्द आणि विषय प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा, आवडीचा आहे.पण जेवढी ही मैत्री आपल्याला आपली,जवळची वाटते तेवढी ती खरच नेहमी असते का? मैत्री तेवढी खरी असते का? की मैत्री म्हणजे प्रसंगानुसार, कामानुसार,वेळेनुसार बदलणारी असते.

काही प्रसिद्ध लोकांच्या म्हणण्यानुसार मैत्री म्हणजे स्वार्थासाठी एकत्र आलेली दोन माणसे खरच अशी पण असते का मैत्री?की मैत्री म्हणजे चित्रपट, मालिकांमध्ये दाखवली जाणारी अगदी पाण्यासारखी निर्मळ,नेहमी एकमेकांना स्वतःच्या आयुष्यात काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहित करणारी,एकमेकांचे भल चितनारी.मैत्री च्या कराव्या तेवढ्या व्याख्या कमीच आहेत.आज तशीच एक मैत्रीची व्याख्या बघुयात आणि अनुभवूयात.

जानकी ला आता तो जिव्हाळा वाटत नव्हता.ऐश्वर्या ची आठवण आली,तिच्याशी संबंधित गोष्टी आठवल्या तरी आता त्या आठवणीत तो ओलावा जिव्हाळा वाटत नव्हता. रिया ची गोष्ट भाग एक इथे वाचा
आज ऐश्वर्या चा वाढदिवस होता, काल रात्रीपासून जानकी ला ऐश्वर्या ची खूप आठवण येत होती पण तिला फोन करावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्याव्या असं अजिबात वाटत नव्हतं.तरीसुद्धा परत एकदा कॉलेज च्या त्या छान आठवणीत जानकी रमलीच.जानकी ला आठवला तो कॉलेजचा पहिल्या वर्षाचा पहिला दिवस.TRUE FRIENDSHIP STORY

सगळं एकदम नवीन होते.नवीन माणसे,जागा सगळं काही एकदम नवीन अनोळखी.आणि सहज शेवटच्या बेंचवर लक्ष गेलं तर ११वी,१२वी ला तिच्यासोबत शिकलेली आकांक्षा तिला दिसली,त्यामुळे जानकी थोडी खूश झाली. तसं आकांक्षा आणि जानकी ची काही एवढी खास मैत्री नव्हती पण एक ओळख होती.

आकांक्षा चा स्वभाव म्हणजे अगदी सहज कोणा सोबतही मैत्री होईल.पण जानकी जरा कमी बोलणारी,शांत त्यामुळे आकांक्षा ने पहिल्याच दिवशी खूप जणांशी मैत्री केली सुद्धा.त्यामुळे जानकी एकटीच होती.हळू हळू एक एक दिवस पुढे जात होता.खूप जण एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते.त्यामुळे त्यांचे ग्रुप आधीपासूनच होते.जानकी ची कोणासोबत खास काही ओळख नसल्याने जानकी रोज आपली कॉलेज ला येऊन बसायची,नवीन क्लासमेट्स सोबत ओळख करून घेत होती.

TRUE FRIENDSHIP STORY

TRUE FRIENDSHIP STORY

एक दिवस अश्विनी सोबत जानकी बसली.अश्विनी उस्मानाबाद वरून शिक्षणासाठी पुण्यात आली होती.जानकी आणि आश्र्विनीच्या गप्पा पहिल्याच दिवशी चांगल्या रंगल्या आणि मग हळू हळू त्या एकमेकांसोबत रोज एका बेंचवर बसू लागल्या.नंतर मग पुढे बसणाऱ्या दीपिका आणि अनुजा सोबत जानकी आणि अश्विनी ची मैत्री होऊ लागली.दीपिका आणि अनुजा राहायला एकाच ठिकाणी होत्या,त्यामुळे त्यांची देखील आधीपासून ओळख असणे साहजिकच होते.दोघी कॉलेजला एकत्र येत जात असे.

असं हळू हळू जानकी ची रोज कोणा ना कोणासोबत ओळख होऊ लागली होती.आणि अखेर जानकी ची कॉलेजची घडी छान रित्या बसू लागली.विज्ञान शाखेला असल्यामुळे हळू हळू प्रात्यक्षिके चालू झाली. प्रात्यक्षिक च्या वेळेस दोन दोन मुली आणि मुले असं जोडी ने करणार होते आणि नेमकं दीपिका आणि अश्विनी दुसऱ्या बॅच मध्ये गेल्या त्यामुळे जानकी आणि अनुजा ची जोडी आपोआपच झाली.

TRUE FRIENDSHIP STORY आता अश्विनी सोबतच अनुजा देखील जनकीची चांगली मैत्रीण झाली.अश्विनी चा प्रात्यक्षिक चा ग्रुप वेगळा असल्यामुळे हळू हळू जानकी आणि अश्विनी एकमेकांपासून दुरावू लागल्या.मैत्री अजून एवढी रुजलीच नव्हती त्यामुळे कोणाला काही तसा फारसा फरक देखील पडला नाही.एक दिवस अनुजा गावी गेली होती त्यामुळे जानकी दीपिका सोबत बसायला गेली.त्यादिवशी जानकी ची ओळख ऐश्वर्या आणि कविता सोबत झाली.ऐश्वर्या आणि कविता दीपिका आणि अनुजा च्या पुढच्या बाकावर बसत.दीपिका,अनुजा,ऐश्वर्या आणि कविता चा छान ग्रुप झाला होता.

आणि जानकी मात्र रोज कोणासोबत ही बसत असे.मग एक दिवस दीपिका कॉलेज ला आली नव्हती त्यामुळे पुन्हा जानकी अनुजा सोबत बसायला गेली आणि तिथे ऐश्वर्या आणि कविता सोबत पुन्हा तिचे बोलणे झाले.जानकी ला ऐश्वर्या आणि कविता फार काही आवडायच्या नाहीत.दोघी जरा स्वभावाने कुचक्या वाटायच्या.
पण दीपिका आणि अनुजा च्या मैत्रिणी असल्यामुळे जानकी त्यांच्यासोबत देखील मनापासून बोलायची.आणि आता एक दिवस कविता आली नव्हती तेव्हा जानकी ऐश्वर्या सोबत बसली.ना जानकी ना ऐश्वर्या कोणीच एकमेकींशी बोलायला तयार नव्हतं.दोघींनी फक्त एकट बसायला नको म्हणून एकमेकांसोबत दिवस काढला होता.

वर्गातल्या सगळ्या मुली तशा जवळ जवळ १८-२० च्या वयोगटातल्या होत्या.त्यामुळे काहींची लग्न झालेली होती,काहींची व्हायची होती.एक दिवस ईरा चे लग्न होणार आहे ही बातमी वर्गात सगळीकडे पसरली. ईरा तर अजून १८ वर्षांची पण झाली नव्हती पण वागणे बोलणे एकदम पुढचं होते. ईरा आणि तिचा भाऊ दोघे एकत्रच एका वर्गात शिकत होते. ईरा तिचा भाऊ रमेश आणि त्यांचे मित्र मैत्रीण असा खूप मोठा ग्रुप होता त्यांचा.सगळे ११वी,१२वी पासून एकत्र शिकत होते आणि आता पदवीच्या शिक्षणाला देखील एकत्र होते.
ईराच लग्न म्हणजे खूप चर्चेचा विषय झाला होता. ईरा आणि त्यांच्या ग्रुप मधल्या तिच्या मैत्रिणी वर्गामध्ये त्यांची खूप हवा असायची.त्या सगळ्यांमध्ये कामिनी नावाची एक मुलगी आणि ईरा यांचे खूप जमायचे.ज्यावेळेस ईरा चा साखरपुडा झाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तर चर्चांना अजून उधाण आलं. TRUE FRIENDSHIP STORY

जणू ईरा म्हणजे कोणत्या मोठ्या सिनेमातील अभिनेत्रीच. ईरा पण खूप भाव खायची.त्यांचं वागणं बोलणे असं असायचं की कोणाला पण त्यांच्या ग्रुप चा मेंबर असावा असे वाटणार.
कामिनी आणि ईरा ची मैत्री बघून एक दिवस जानकी च्या पण मनात आले की माझी पण एखादी अशी छान जवळची मैत्रीण झाली तर किती भारी होईल,पण इथे तर कोणीच मला जवळच वाटत नाही,कॉलेज चालू होऊन इतके दिवस झाले तरी अजून साधं एक आठवडा पण मी कोणासोबत बसले नाहीये.सगळ्यांना मित्र मैत्रीण भेटलेत पण मला नाही.असे अनेक विचार जानकी च्या मनात यायला लागले.

TRUE FRIENDSHIP STORY
TRUE FRIENDSHIP STORY

कॉलेज ची सहल मुंबई ला जाणार होती,खास कोणी मैत्रीण सोबत नव्हती तरीपण जानकी आहे त्यांच्या सोबत सहलीला जाण्यास तयार झाली.बस मध्ये पण सगळे जोडी जोडी ने बसले होते.पण जानकी ने कुठेतरी स्वीकारलं होते की अजून तिचं कोणी असं जवळचं नाहीये त्यामुळे तिने ती एकटी बसलीय या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. नंतर मागे सगळी मुलं बसली होती आणि त्यांचा खूप गोंधळ चालू होता त्यामुळे जानकी पुढे जाऊन बसली,काही वेळाने कविता ला मळमळ जाणवली म्हणून तिला खिडकीत बसायचं होते त्यामुळे तिला खिडकीत जागा देऊन ऐश्वर्या पुढे येऊन जानकी शेजारी बसली.बस आता कॉलेज जवळ पोहचतच होती त्यामुळे जानकी घरी वडिलांना फोन लावत होती,पण फोन लागतच नव्हता,ऐश्वर्या ने लगेच स्वतःचा फोन जानकी ला देऊ केला.त्यावेळेस जानकी ला असे वाटले की ऐश्वर्या कुचकी वाटली तरी मदत पण करते. अजून काही छान छान गोष्टी

एकदा कॉलेजच्या अभ्यासक्रमातील भाग म्हणून सगळ्यांना विद्यापीठात नेण्यात आलं.आणि आदल्या दिवशी ऐश्वर्या कॉलेज ला आली नव्हती.दुसऱ्या दिवशी विद्यापीठात जायच्या वेळेस ऐश्वर्या च्या हातावरची मेहेंदी पाहून सगळे तिला मेहेंदी बद्दल विचारत होते तेव्हा सगळ्यांना खोटे सांगत तिने घरी वास्तुशांती झाल्याचं सांगितलं.आणि मग नंतर लगेच कळलं की तिचा साखरपुडा झाला होता ते.माहीत नाही का?पण ऐश्वर्या ला तिचं लग्न होणार आहे हे बहुधा कोणाला समजून द्यायचं नव्हतं.त्यामुळे ती एवढी लपवाछपवी करत होती.

TRUE FRIENDSHIP STORY
TRUE FRIENDSHIP STORY

ईरा चे लग्न आता जवळ आले होते,आणि आतापर्यंत जानकी आणि ईरा ची बऱ्यापैकी मैत्री देखील झाली होती.आणि असंही ईरा ला तिच्या सौंदर्याचा अहंकार होता त्यामुळे जे तिच्यासोबत बोलतील,तिची विचारपूस करतील असे लोक तिला आवडायचे आणि जानकी एकदम उलट जानकी ला या असल्या गोष्टी अजिबात आवडत नव्हत्या पण ईरा सोबत चांगले बोलणे चालणे होते त्यामुळे ईरा ने जानकी ला स्वतःच्या लग्नाला बोलावले होते.आतापर्यंत ऐश्वर्या,कविता,दीपिका,अनुजा या देखील तशा जानकी च्या तशा चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या.त्यामुळे जानकी ला लग्नाचे आमंत्रण मिळाल्याचे चौघीं मध्ये फारसे कोणाला आवडले नाही.मग त्या चौघीना ईरा ने आमंत्रण दिले नव्हते म्हणून त्यांच्या मनात खटक होती की अजून काही देव जाणे.अनुजा आणि ऐश्वर्या ने जानकी ला विचारलं की ईरा च्या लग्नाला जाणार आहेस का? त्यावर जानकी ने अगदी सहजतेने हो म्हणून सांगितलं,पण जानकी ला हे देखील समजत होतं की आपण ईरा सोबत मैत्री करणे या कोणाला आवडत नाहीये.

पण असंही जानकी अजून कोणाचीच चांगली मैत्रीण नव्हती त्यामुळे कोणाचे मन जपण्याचा प्रश्न देखील येत नव्हता.म्हणून जानकी ने बिनधास्त स्वतःच्या मनाला जे पटेल तसे वागायचे ठरवले.आणि जानकी लग्नाला गेली सुद्धा,आणि लग्नामध्ये छान मजा मस्ती देखील केली.

दुसऱ्या दिवशी जेव्हा जानकी आणि इतर मुली एकमेकींना ईरा च्या लग्नातले फोटो देत घेत होत्या तेव्हा परत अनुजा आणि दीपिका ला प्रश्न पडला की जानकी ईरा च्या लग्नाला खरचं गेली होती का?माहीत नाही का,काय पण काहीतरी असं होते की जे ऐश्वर्या,कविता, दीपिका आणि अनुजा ला जानकी बद्दल थोडेसे आवडले नव्हते.पण जानकी ला या सगळ्या गोष्टींचा काही फरक पडत नव्हता.कारण तिला माहित होतं,या चौघी जरी तिच्या सोबत बोलत असल्या तरी त्यांच्या यादी मध्ये तिचा नंबर एकदम शेवटी होता.

जानकी त्या चौघिंसाठी एक पर्याय होती.आणि या उलट ईरा आणि बाकी मैत्रिणी,त्यांना जानकी कोणासोबत बोलते,उठते याबद्दल काहीच देणं घेणं नव्हतं,त्यांचं थोडे फार जानकी सोबत पटायचं म्हणून त्या एकमेकांसोबत बोलत असे.

कॉलेज चे शेवटचे वर्ष संपत आले होते,आणि आता वार्षिक परीक्षा देखील चालू झाल्या होत्या.अशातच दीपिका आणि अनुजा ऐश्वर्या च्या लग्नाबद्दल बोलत असताना जानकी ने ऐकलं,त्यासाठी ऐश्वर्या ला काहीतरी भेटवस्तू वगैरे घ्यावी अशी देखील त्यांची चर्चा चालू होती.आणि जानकी आणि ऐश्वर्याचे जे काही संबंध होते किंवा बोलणे व्हायचं ते अनुजा आणि दीपिका मुळे व्हायचं म्हणून जानकी ऐश्वर्याच्या लग्नाबद्दल अजिबात उत्सुक नव्हती.पण जानकी चकित झाली जेव्हा ऐश्वर्या ने अचानक परीक्षेच्या शेवटच्या दिवशी अनुजा,दीपिका,कविता सोबत तिला देखील लग्नाचे आमंत्रण दिले.
जानकी ला एकदम अनपेक्षित होतं.

मनोरंजनाची दुनिया

काय मग वाचक रसिक मायबाप जानकी आणि ऐश्वर्याच्या गोष्टीतील चढाओढ वाचताना मजा आली की नाही,आता तर गोष्ट चालू झालीय अजून खूप काही व्हायचं आणि तुम्ही वाचायचं राहिलंय.अजून पुढे काय काय होतंय हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच,या गोष्टीचा पुढचा भाग तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही देखील तितकेच उत्सुक आहोत.तर लवकरच भेटुयात पुढच्या भागात.
तोपर्यंत खूश राहा,आनंदी राहा,वाचत राहा,आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर काम करत रहा.

धन्यवाद!!!

TRUE FRIENDSHIP STORY