नमस्कार वाचक रसिक हो,मागच्या भागात भाग एक इथे वाचा आपण जानकी ची साधी सुधी स्वप्न बघितली,एक मुलगी कॉलेज ला जाते एकदम नवीन जग,नवीन लोक त्यांच्या सोबत जुळवून घेताना नकळतपणे स्वप्न विनयला लागते ते चला तर मग बघुयात काय होतंय पुढे.
सादर आहे गोष्टीचा भाग २
TRUE FRIENDSHIP STORY परीक्षा झाल्यानंतर अनुजा आणि दीपिका ने काहीतरी भेटवस्तू घेऊयात याबद्दल कविता आणि जानकी ला देखील कल्पना दिली.चौघी जणी ठरवून पुन्हा एकदा वस्तू खरेदी साठी एकत्र भेटल्या आणि ऐश्वर्या साठी एक शो केस मध्ये ठेवण्याची गोष्ट छान भेट म्हणून घेतली.पण ती वस्तू काय जानकी ला अजिबात आवडली नव्हती,कारण त्यांनी त्या वस्तू साठी मोजलेले पैसे आणि त्या वस्तूची गुणवत्ता या मध्ये काहीच ताळमेळ नव्हता.पण अनुजा,दीपिका,कविता ऐश्वर्याच्या जास्त जवळच्या असल्यामुळे जानकी ने जास्त लुडबुड केली नाही.
जानकी ला वाटत होते की ऐश्वर्या ला अजून छान काहीतरी अशी वस्तू द्यायला पाहिजे होती की जी आयुष्यभरासाठी तिच्या मैत्रिणींची एक आठवण म्हणून तिच्याकडे राहील.त्या गोष्टीचा वापर करताना ऐश्वर्या ला नेहमी आठवण तिच्या मैत्रिणींची आठवण होईल.अशी वस्तू नाही की जी काही काळ शोभा वाढवून तुटून जाईल आणि त्याचे तुकडे सांभाळता सांभाळता माणूस वैतागून जाईल. रिया ची गोष्ट भाग एक इथे वाचा
जानकी,दीपिका,अनुजा,कविता आणि अजून इतर मित्र मैत्रिणी ऐश्वर्याच्या लग्नाला गेले.सगळ्या मिळून ऐश्वर्या ला लग्नाअगोदर तिच्या खोलीत भेटायला गेल्या.ऐश्वर्या ची गडबड चालू होती.पण ऐश्वर्या एवढी छान दिसत होती की सगळ्या बघतच राहिल्या.आत मध्ये गेल्यावर ऐश्वर्या च्या नजरेस पहिल्यांदा जानकी पडली.जानकी ला बघताच छान दिसतेस असे शब्द ऐश्वर्याच्या तोंडातून बाहेर पडले.आणि जानकी पण एकदम खुश झाली.
लग्नानंतर १५-२० दिवस झाल्यावर पुढील वर्षाची ॲडमिशन ची लगबग चालू झाली.पुढच्या वर्षासाठी विषय निवडण्याचे पर्याय होते.कविताला भौतिकशास्त्र(फिजिक्स) ची खूप भीती वाटायची, म्हणजे विषयापेक्षा शिकवणाऱ्या शिक्षकांची भीती वाटत होती.त्यामुळे कविताने ठरवलं होते,की ती प्राणीशास्त्र(झूलॉजी)निवडणार आहे.आता ऐश्वर्या ला प्रश्न पडला होता काय करावं ते,कारण कविता ने विषय बदलल्यावर ऐश्वर्या ला वर्गात एकटेच बसावं लागणार होतं.
त्यामुळे एकटे पडायच्या भीतीने ऐश्वर्या चिंतित होती.आणि जानकी च म्हणायचं झालं तर,जानकी ला मानवी शास्त्र ची आवड होती.पण तसा काही पर्याय नसल्यामुळे आणि प्राणीशास्त्र ची घोकंपट्टी करणे अवघड वाटत असल्यामुळे जानकी ने देखील भौतिक शास्त्र निवडायचं ठरवलं.आणि कॉलेज च्या पहिल्या वर्षापासून जानकी एकटी असल्यामुळे या गोष्टींचा तिला फार काही असा फरक पडत नव्हता.
अनुजा आणि दीपिका देखील भौतिक शास्त्र घेणार होत्या.
अनुजा आणि जानकी च्या बोलण्यावरून ऐश्वर्या ला कळलं की जानकी ने भौतिक शास्त्र विषय निवडला आहे.आणि अनपेक्षितपणे ऐश्वर्या ने जानकी ला फोन केला.ऐश्वर्या चे नुकतेच लग्न झाल्यामुळे तिने कसा काय फोन केला असा प्रश्न जानकी ला पडला.जानकी ने फोन उचलल्या वर ऐश्वर्याची,तिच्या घरच्यांची विचारपूस केली.आणि मग असच बोलता बोलता ऐश्वर्या ने जानकी ला कोणता विषय निवडला आहे असं विचारलं. TRUE FRIENDSHIP STORY
जानकी ला थोडी कल्पना होती पण तरी ऐश्वर्या असा प्रश्न का विचारते आहे हा पण प्रश्न तिला पडला होता.ऐश्वर्या ची मजा करायची म्हणून जानकी ने अगोदर खोटेच उत्तर दिलं,पण नंतर ऐश्वर्याच्या आग्रहाखातर खरं काय ते सांगून टाकल.
ॲडमिशन वगैरे झालं आणि अखेर कॉलेज चे दुसरे वर्ष चालू झाले.जानकी एका बेंच वर आणि अनुजा,दीपिका नेहमीसारखं एकत्र असे बसल्या होत्या.अचानक ऐश्वर्या आली आणि जानकी शेजारी बसली.जानकी ला आश्चर्य च वाटलं.कारण हे अगदी अनपेक्षित होतं.आता हळू हळू अनुजा,दीपिका,जानकी,ऐश्वर्या असा चार जणींचा छान छोटासा एक ग्रुप बनू लागला.
जानकी हळू हळू त्यांच्यात मिसळू लागली.काही दिवसांनी दुसऱ्या वर्षाची परीक्षा आली,आणि जानकी ला खूप टेन्शन आलं होतं,कारण तिचा काहीच अभ्यास झाला नव्हता.आणि तिला वाटू लागलं,की आता ती परीक्षेमध्ये नापास होते का काय?त्यामुळे तिची खूप चीड चीड होत होती.कारण अभ्यासाला बसल्यावर जानकी च्या डोक्यात सारखे ऐश्वर्या चे विचार येत होते.काही वेळाने परत ऐश्वर्या चा मेसेज आलाच,आणि आता जानकी चांगलीच संतापली होती.
कारण जानकी खूप प्रयत्न करत होती अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे पण तिच्याकडून ते होत नव्हतं.शेवटी जानकी ने ऐश्वर्या ला मेसेज केला की तू मला सारखे फोन किंवा मेसेज करू नकोस नाहीतर मी तुला ब्लॉक करून टाकेल.आता मला अजिबात मेसेज करू नकोस,आणि जानकी ने बोलल्याप्रमाणे केलं देखील.
पण या वेळेस ऐश्वर्या ने समजुतीने वेळ सावरून नेत जानकी ला संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाच.आणि काही वेळाने जानकी ला पण स्वतः केलेली चूक कळली होती.त्यामुळे आता जानकी ला खूप लाजल्यासारखे वाटत होते.कोणत्या तोंडाने पुन्हा ऐश्वर्या सोबत बोलायला जावू असे तिला झाले होते.पण गंमत अशी झाली की,ऐश्वर्या च नेमकी जानकी च्या घरी आली.आणि त्याने जानकी खूप खुश झाली.पण जानकी ला ऐश्वर्या ची माफी देखील मागायची होती.
शेवटी त्या दिवशी संध्याकाळी जानकी ने एकदाचा ऐश्वर्या ला फोन केला आणि तिची माफी मागितली.ऐश्वर्या ने देखील मोठ्या मनाने जानकी ला माफ केलं.
हळूहळू नकळतपणे कुठेतरी जानकी आणि ऐश्वर्याची मैत्री फुलू लागली होती हे मात्र खर,दोघी जाणते न जाणतेपणी एकमेकांच्या जवळच्या मैत्रिणी होत होत्या.आता जानकी आणि ऐश्वर्या एकाच बेंच वर बसत असल्यामुळे खूप गप्पा होऊ लागल्या,गप्पांचे रूपांतर किस्से सांगण्यात ऐकण्यात झालं.काही दिवसांनी दुसरी परीक्षा होणार होती त्याचे वेळापत्रक पण आले होते.
TRUE FRIENDSHIP STORY अजून काही छान छान गोष्टी
आता परत सगळ्यांची अभ्यासाची गडबड चालू झाली.पेपर च्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी ऐश्वर्या ने परत जानकी ला फोन केला.आणि जानकी कॉलेज वरून थकून भागून आल्यामुळे दमली होती आणि झोपली होती.म्हणून तिने काही ऐश्वर्या चा फोन उचलला नाही.
परत थोड्या वेळाने ऐश्वर्याचा फोन आलाच,फोन उचलल्यावर माहीत नाही काय झालं पण ऐश्वर्या आणि जानकी हसायला लागल्या.आणि त्यांनाच माहीत नव्हतं काय झालं हसायला.मग ऐश्वर्या ने विचारलं अभ्यास झाला का उद्याचा?
जानकी ला फार हसायला येत होतं,कारण तिला माहीत होतं ऐश्वर्या असच मुद्दाम काहीतरी टाईमपास करायला फोन करत होती ते.रोज ऐश्वर्या जानकी ला फोन करायची आणि जानकी फोन उचलत नसे.हळू हळू जानकी आणि ऐश्वर्या अजून जवळ येत गेल्या.जानकी आणि ऐश्वर्या च्या गप्पा खूप रंगायला लागल्या.कॉलेज मध्ये लेक्चर चालू असताना दीपिका आणि अनुजा च्या मागे लपून लपून गप्पा मारायच्या,कधी कधी पकडल्या जायच्या पण तरी काही सुधार नाही.
मैत्री एवढी वाढली होती की अजिबात एकमेकांशिवाय राहावत नव्हतं,कॉलेज वरून घरी जाईपर्यंत फोन वर बोलत,घरी गेल्यानंतर परत चहाच्या वेळेला फोन वर गप्पा मारायच्या,आणि बोलायला विषय पण खूप असायचे. कॉलेज चे सुरवातीचे दिवस आठवून एकमेकांविषयीचे मत एकमेकींना सांगून हसत बसायच्या. तास न तास गप्पा मारायच्या.या अगोदर जानकी ने कधीच कोणासोबत एवढी जवळीक साधली नव्हती. पहिल्यांदाच एवढं कोणाच्या तरी जवळ गेल्यामुळे जानकी ला कधी कधी खूप काळजी पण वाटायची,कारण आता सगळीकडे जानकी आणि ऐश्वर्या ला त्या दोघी सोडून कोणीच दिसत नव्हतं.
एकदा एकमेकांसोबत गप्पा मारताना कॉलेज च्या अगोदर एकमेकांचे आयुष्य याविषयी बोलणे चालू होते.जानकी ने स्वतःबद्दल सगळ पटपट सांगून टाकलं आणि ऐश्वर्या ला स्वतःबद्दल विचारलं असता जानकी च्या लक्षात आलं की ऐश्वर्या तेवढं सरळ सरळ सगळ सांगत नाही जेवढं आपण तिच्यासोबत बोलतो आणि तिच्याकडून देखील अपेक्षा ठेवतो.ऐश्वर्या काही गोष्टी एकदम अशा सांगता सांगता थांबायची,आणि नंतर काही नाही म्हणून विषय बंद करून टाकायची ही गोष्ट जानकी ला अजिबात आवडली नाही आणि जानकी ने सरळ सरळ ऐश्वर्या सोबत बोलणे च बंद केलं.जानकी वेगळी बसायला लागली.
ऐश्वर्या देखील या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नव्हती.ना की ऐश्वर्या ला जानकी च्या रुसण्याचा काही फरक पडत होता.त्यामुळे जानकी ला खूप राग यायचा चीड चीड व्हायची कारण जानकी ने ऐश्वर्या ला जेवढं स्वतःच्या जवळच समजल होतं तेवढं ऐश्वर्या कडून काहीच प्रतिसाद येत नव्हता. TRUE FRIENDSHIP STORY
ऐश्वर्या आणि जानकी मधील अबोला अनुजा ने हेरला आणि पुढाकार घेत दोघीं मधील अबोला संपवण्याचे ठरवले.पण या गोष्टीचा देखील काही फायदा झाला नाही.कारण जानकी देखील खूप चिडली होती आणि ऐश्वर्या ला तर काही फरक पडत नव्हता.
असच करता करता एक एक दिवस पुढं गेला आणि पहिल्या सत्राची परीक्षा देखील येऊन ठेपली.अगोदर ऐश्वर्या सारखी फोन करते म्हणून जानकी चा अभ्यास होत नव्हता आणि आता जास्त काही न बोलताच झालेल्या वादामुळे जानकी अजून डिस्टर्ब झाली होती.परीक्षा झाली सुट्या चालू झाल्या पण तरी ऐश्वर्या आणि जानकी एकमेकांसोबत बोलत नव्हत्या.
काही दिवसांनी क्लास मधील काही दुसऱ्या मैत्रिणींना जानकी च्या घराजवळील एक संग्रहालय बघायचे होते म्हणून त्यांनी जानकी ला सोबत येशील का असे विचारले.जानकी ने देखील ऐश्वर्या च्या विचारांपासून थोडा आराम मिळावा,दूर वेगळ्या वातावरणात जाता यावं म्हणून त्यांच्या सोबत जाण्याचा विचार केला.पण जानकी ऐश्वर्या पासून लांब जाऊच शकत नव्हती.दोघी बोलत नव्हत्या तरी जानकी च्या डोक्यात सारखे ऐश्वर्याचे विचार येत होते.
आणि न राहवून जानकी ने ऐश्वर्या ला फोन लावला आणि सोबत फिरायला येण्याबद्दल विचारलं पण ऐश्वर्या काही रस नसल्यासारखे वर वरच्या मनाने बोलत होती.ऐश्वर्याच्या अशा वागण्याने जानकी अजून दुखावली गेली.
जानकी दुसऱ्या मैत्रिणींसोबत फिरायला गेली पण मनातून खूप दुखावलेली होती,सारखं ऐश्वर्याच्या विचारात मग्न असायची.बाकीच्यांना दाखवण्यासाठी वर वर च्या मनाने हसत होती.डोळ्यांमध्ये स्पष्ट पणे नाराजी दिसायची पण.मग सारखं अधून मधून न राहवून ऐश्वर्या ला फोन मेसेज करायची पण ऐश्वर्या एकदम दगडासारखे रिप्लाय द्यायची.जानकी ला हळू हळू वाटायला लागले की ऐश्वर्याची आपल्यासोबत बोलायची इच्छा नसताना आपण सारखं तिला फोन,मेसेज करायला नको.आणि एवढं पण काही झालेलं नाहीये ज्याचा ऐश्वर्या ला एवढा राग यावा.किती दिवस जानकी ने माघार घ्यायची या विचाराने ऐश्वर्याचा विषय आता कायमचा सोडून द्यायचा असं ठरवलं.पण जानकी ऐश्वर्या मध्ये एवढी गुरफटून गेली होती की शेवटी परत एकदा चांगल्या मनाने ऐश्वर्या ला तिचा वेळ द्यावा असा विचार करत ऐश्वर्या ला एकदा शेवटचा मेसेज केला. मनोरंजनाची दुनिया
आपल्याला वाटलं नव्हतं जानकी आणि ऐश्वर्याची मैत्री होईल कारण दोघी एकदम विरुद्ध स्वभावाच्या दिसत होत्या.पण आश्चर्य म्हणजे मैत्री झाली देखील,फुलली देखील आणि नेहमीसारखं चांगल्या नात्यामध्ये एकदम कठोर,परीक्षेची वेळ येते ती वेळ देखील आली आहे हे आपण वाचलच,जानकी आणि ऐश्वर्याची मैत्री चा हा शेवट होता की इथून त्या दोघींची मैत्री अजून घट्ट होणार होती.पाहुयात पुढच्या भागात,तोपर्यंत खूश राहा,आनंदी राहा,वाचत रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर काम करत राहा.
भेटुयात पुढच्या भागात.
धन्यवाद!!!
TRUE FRIENDSHIP STORY