TRUE FRIENDSHIP STORY

TRUE FRIENDSHIP STORY जानकी ने न राहवून एकदा शेवटचा मेसेज केला पण ऐश्वर्या ने रिप्लाय दिला का? ऐश्वर्या आणि जानकी चे बोलणे झाले की नाही.असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील हो ना? चला तर मग बघुयात काय होतंय ते.

हाय ऐश्वर्या,काय करतीयेस? झाली का घरातली कामं आणि तुझं आवरून? काय झालं तुला अजून किती दिवस असा रुसवा धरून बसणार आहेस?जाऊदेत ना दे आता सोडून जे झालं ते झालं.किती दिवस माझ्यासोबत बोलणार नाहीये? तुला माझी अजिबात आठवण येत नाही का?माझ्यासोबत बोलावंसं वाटत नाही का?

असं काय झालं ग?,की त्या गोष्टीचा तुला एवढा राग आला आहे.
जसं मी माझ्याबद्दल सगळ तुला सांगितल तसचं तू सुद्धा सांगावं एवढीच तर साधी अपेक्षा होती ना माझी मग तुला एवढा राग येण्यासारखं काय आहे?

TRUE FRIENDSHIP STORY
TRUE FRIENDSHIP STORY

असो तुला अजूनही माझ्यासोबत बोलायचं नाहीये ठीक आहे.तू घे तुझा वेळ,तुला वाटेल तेव्हा मला फोन नाहीतर मेसेज कर.आता या पुढे मी तुला अजिबात संपर्क करणार नाही.तुझ्या फोन आणि मेसेज ची वाट बघेन आणि तू नाहीच फोन केलास तर मी समजून जाईल आपली मैत्री इथ पर्यंतच होती.
असा मेसेज जानकी ने ऐश्वर्या ला केला.

TRUE FRIENDSHIP STORY भाग एक इथे वाचा

आणि जानकी खूप रडली.जानकी ला एकीकडे असं वाटायचं की तिचं काही चुकलं नाहीये आणि एकीकडे असं वाटायचं की जाऊदेत ऐश्वर्या ला आपल्याला काही सांगायचे नाही तर जाऊदेत तिच्या मनासारखं होऊदे.पण नंतर हा पण विचार मनात यायचा की मी माझ्याबद्दल सगळ सरळ सरळ सांगून टाकल,तर माझ्या या गोष्टींचा ऐश्वर्या ने फायदा घेतला तर? जानकी च्या मनाची दोन्हीकडून खूप कोंडी झाली होती.ऐश्वर्या ला शेवटचा मेसेज केला खरं पण जानकी ला ऐश्वर्या शिवाय राहावत नव्हतं.

जानकी रोज सकाळी उठल्या उठल्या आणि दिवसातून अनेक वेळा,परत रात्री झोपताना फोन पुन्हा पुन्हा चेक करत असे.रोज जानकी ला वाटायचं की ऐश्वर्या आज मेसेज करेल उद्या करेल पण ऐश्वर्या ने मेसेज केलाच नाही.कधी कोणाचा फोन आला तर ऐश्वर्याचा फोन आला या आशेने पटकन फोन जवळ पळत जात.आणि दुसर कोणाचा फोन आहे हे बघून परत दुखावली जात.काही दिवसांनी जानकी ने ठरवले जाऊदेत नाही बोलायचं नको बोलूदेत,एवढं काही खूप मोठं नाही या मध्ये,आयुष्यात लोक येतात जातात आणि ते चालूच राहणार,बहुधा आपली आणि ऐश्वर्या ची मैत्री एवढ्याच दिवसांसाठी होती.किती आपण विचार करायचा आणि स्वतःला दुखवून घ्यायचं.

TRUE FRIENDSHIP STORY

पुढच्या आठवड्यात कॉलेज चालू होणार होतं,कोण पहिल्या दिवशी येणार कोण नाही वगैरे अशी चर्चा ग्रुप वर चालू होती,दीपिका आणि अनुजा गावावरून थोडं उशिरा येणार होत्या त्यामुळे जानकी विचार करत होती काय करावं,पण नंतर त्यांचा अचानक मेसेज आला की पहिल्या दिवशी कॉलेज मध्ये भेटुयात.

भाग दोन इथे वाचा

कॉलेज ची आवरा आवरी आणि घरातलं काम अशी जानकी ची गडबड चालू होती.
उद्या सकाळी लवकर उठायचं आहे या विचाराने जानकी पटपट सगळी कामं आवरायच्या मागे होती.सगळी बॅग भरली आणि आता जेवायला बसणार तर अचानक फोन वाजला आणि बघते तर काय ऐश्वर्याचा फोन.जानकी ला आनंद कमी आणि प्रश्न च पडला आता काय झालं? ऐश्वर्या ने का फोन केलाय?फोन उचलू की नको या विचारात फोन उचलला.

जानकी ने फोन उचलल्यावर ऐश्वर्या म्हणली हॅलो? जानकी काय करतीयेस त्यावर जानकी ने काही नाही असं शांत उत्तर दिलं.जानकी च्या आवाजात काहीच आनंद,उत्सुकता नव्हती.कारण जानकी ने ऐश्वर्या ला गेल्या काही दिवसात खूप म्हस्का मारला,तिची मनधरणी केली.त्यामुळे जानकी ला आता अजून अपमान करून घ्यायचा नव्हता आणि स्वतःला अजून दुखवून घ्यायचं नव्हतं.
ऐश्वर्या काही कारण नसताना पण जानकी ला सॉरी बोलली,जानकी ने विचारलं काय झालं सॉरी का म्हणतीयेस?

त्यावर ऐश्वर्या म्हणाली मी तुझ्यासोबत नीट बोलले नाही तू एवढं फोन,मेसेज करत होतीस तरी मी नीट बोलायचे नाही.तरी सुद्धा तू मला वेळ दिला आणि माझी वाट बघत होतीस. चुकलं माझं.
ऐश्वर्या ला जाणीव होतीय हे बघून जानकी खूश झाली आणि एकदम आनंदी झाली,मजे मजेत ऐश्वर्या ला म्हणू लागली नाही नाही तुला अजून पाहिजे तेवढा वेळ घे.

ऐश्वर्या हसायला लागली नाही नाही म्हणली घेतला तोच वेळ खूप झाला.मला समजत नाही वगैरे बोलू लागली.आणि उद्या कॉलेज ला येणार आहे ना? असं विचारू लागली.जानकी ने हो म्हणून सांगितलं.दोघींनी फोन ठेवला.फोन ठेवल्यावर जानकी एकदम आनंदाने उड्या मारू लागली.जानकी ला खूश बघून जानकी ची आई देखील खूश झाली. आता एवढी छान गोष्ट झाली म्हणल्यावर जानकी ला कसली झोप लागतेय तेव्हा.आनंदाने जानकी रात्रभर जागीच.कधी एकदाची सकाळ होतीय आणि कॉलेज ला जाऊन ऐश्वर्या ला भेटते असं झालं होतं जानकी ला.

TRUE FRIENDSHIP STORY
TRUE FRIENDSHIP STORY

सकाळी लवकर उठून छानपैकी तयार होऊन जानकी कॉलेज ला गेली,पण नेहमीप्रमाणे ऐश्वर्या ला यायला उशीर झाला. भांडणानंतरची ही त्यांची पहिली प्रत्यक्ष भेट होती.समोरासमोर आल्यावर दोघी सुरुवातीला खूप वेळ फक्त हसतच बसल्या.आणि मग गाडी रुळावर आल्यासारखं त्यांची मैत्री परत मार्गावर आली.कॉलेज सुटल्यानंतर छान कॉफी प्यायला गेल्या,एकमेकीसोबत छान छान फोटो काढले आणि घरी निघाल्या.

आणि परत पहिल्यासारखे त्यांचं घरी जाईपर्यंत फोन वर बोलणे चालू झालं.
अधून मधून सोबत वेळ घालवता यावा म्हणून कॉलेज सुटल्यावर कधी कॉफी,कधी मार्केट मध्ये अशीच चक्कर मारायला म्हणा अशा प्रकारे जानकी आणि ऐश्वर्या फिरत असे.जानकी दोघींचे फोटो स्टेटस ला पोस्ट करत असे ते बघून दीपिका आणि अनुजा खूप नाराज असायच्या.त्यांना वाटायचं की आपण चौघी जणी फिरायला जायला पाहिजे ना? जानकी आणि ऐश्वर्याच वागणं म्हणजे एखाद्या प्रेमी युगुलासारख होतं.त्यामुळे दीपिका आणि अनुजा खूप चीड चीड करायच्या.पण जानकी आणि ऐश्वर्या ला त्या दोघी सोडून कोणीच नको असायचं,त्यामुळे त्या गुपचूप न सांगता फिरायला जायच्या.

TRUE FRIENDSHIP STORY हळूहळू त्यांचं बघून अनुजा आणि दीपिका ने पण बाहेर फिरायला जाणं,कॉफी ला जाणं वगैरे चालू केलं.आणि दीपिका फोटो पोस्ट करायला लागली.जानकी खूप खुश व्हायची की दीपिका आणि अनुजा तिच्या ( जानकी ) आणि ऐश्वर्या च्या मैत्रीवर जळतात म्हणून.मनोमन खूश असायची ऐश्वर्या सारखी बेस्टी तिला मिळाली म्हणून.पण ऐश्वर्या या गोष्टींमध्ये जास्त लक्ष घालत नव्हती.त्यामुळे कधी कधी जानकी ला प्रश्न पडायचा की या मैत्री मध्ये काय फक्त मीच आहे का? कारण ऐश्वर्या कडून काहीच प्रयत्न दिसत नाहीत अनेकदा.

ज्या गोष्टींवर ऐश्वर्या ने काहीतरी बोलावच असं वाटतं अशा वेळेस ती एकदम गप्प बसते.असं जाणवत की ती हुशारीने भांडण,वाद या गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवते.पण तसं असेल आणि जानकी वर मनापासून प्रेम असेल तर तिने जानकी ला पण या गोष्टींपासून सावध करायला पाहिजे ना..जानकी ला देखील ऐश्वर्या च हे असं सारखं सारखं अंग चोरण आवडत नव्हत.बर एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा एक गोष्ट ज्याची जानकी वाट बघत होती की कधी ऐश्वर्या ज्या गोष्टीवरून जानकी आणि तिचे भांडण झाले होते ती गोष्ट जानकी सोबत शेअर करणार होती ती गोष्ट ऐश्वर्या ने अजून पण सांगितली नव्हती.ऐश्वर्या ने कधी विषय पण नव्हता काढला,म्हणून मग जानकी ने ऐश्वर्या ला आठवण केली त्यावर ऐश्वर्या ने सगळ सांगणार आहे या बद्दल जानकी ला विश्वास दिला.

परत काही दिवस गेले आणि पहिले पाढे ५५ अशी गत झाली होती.ऐश्वर्या आता नाही जमणार,आता वेळ नाही,नंतर सांगते,मेसेज वर नको भेटल्यावर सांगते.अशी एक ना अनेक कारण जानकी ला द्यायला लागली.जानकी ला खूप राग आला होता हळू हळू जानकी नाराज राहायला लागली ऐश्वर्या च्या पण हे लक्षात येत होतं एक दिवस तिने जानकी ला विचारलंच काय झालंय,नीट का बोलत नाहीस?, आधीसारख छान कधी बोलणार वगैरे वगैरे.मग जानकी ने पण सरळ सरळ सांगून टाकलं,आता तुला काही सांगायचंच नाहीये,माझ्यावर विश्र्वासच नाहीये तर बोलून तरी काय फायदा.

एक दोन दिवस जानकी आणि ऐश्वर्या मधील वातावरण जरा शांतच होतं,दोघी एकमेकांसोबत बोलायच्या पण जानकी फार मोजकच बोलायची.जेवढ्यास तेवढं अगोदर सारखी मनमोकळे पणाने गप्पा नाही मारायची.तिसऱ्या दिवशी सकाळी जानकी ला अचानक ऐश्वर्याच्या घरून फोन आला,घरून म्हणजे माहेराहून.

TRUE FRIENDSHIP STORY ऐश्वर्या चे आई बाबा कॉलेज पासून जवळच राहायला होते.फोन वर ऐश्वर्या ची आई जानकी सोबत बोलली,म्हणे अग ऐश्वर्या आज सकाळी खूप रडत होती काय झालं का तुमच्या मध्ये,तिने सांगितलं जानकी माझ्यासोबत बोलत नाहीये म्हणून.असं सांगून ऐश्वर्याच्या आई ने जानकी ला घरी बोलवून घेतलं.जानकी ला ऐश्वर्या चा स्वभाव अतिशय चांगल्या रित्या माहीत होता,ऐश्वर्या अशी हळवी मुलगी नाहीये हे माहीत होतं जानकी ला.काय करावं असा प्रश्न जानकी ला पडला होता.

त्यामुळे मग जानकी ने स्वतःच्या घरी आई ला फोन करून सगळ सांगितलं आणि काय करू असं विचारलं.त्यावर जानकी ची आई म्हणाली जानकी तुला त्यांच्या घरी जायचंय तर जा पण अजिबात ताण घेऊ नकोस तुला जर चुकीचं भासवत असतील तर अजिबात एक गोष्ट ऐकून घेऊ नकोस.जानकी मैत्रीखातर ऐश्वर्या च्या घरी गेली.तिथे गेल्यावर ऐश्वर्या,तिची बहीण,आणि आई असे घरी होते.गेल्या गेल्या ऐश्वर्या ची बहिण आणि आई जानकी ला विचारू लागले काय झालं जानकी तुमच्या दोघींमध्ये अग ऐश्वर्या सकाळ पासून रडतीय काही बोलायला तयार नाही.

जानकी ची या सगळ्या प्रकारावर ऐश्वर्या च्या घरच्यांविषयी काय मत आणि प्रतिक्रिया असेल.काय होईल पुढे बघुयात पुढच्या भागात.
तोपर्यंत खूश राहा,आनंदी राहा,वाचत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर काम करत राहा.
धन्यवाद!!!

TRUE FRIENDSHIP STORY मनोरंजनाची दुनिया