TRUE FRIENDSHIP STORY आणि तिघी जणी एकमेकींकडे बघून गालातल्या गालात हसत होत्या.हे बघून जानकी एकदम चकितच झाली,आणि मग तिच्या लक्षात आलं की ऐश्वर्या आणि तिच्या घरच्यांनी आपली चांगलीच मजा केली आहे.जानकी च्या चांगल्या,निर्मळ भावनांची खिल्ली उडवली गेली होती.त्यामुळे जानकी अजून चिडली.पण तरीसुद्धा शांतपणे सगळ्यांचं ऐकून घेत होती.
आता मस्करी अजून जास्त वाढायला नको या विचाराने ऐश्वर्या जानकी ला कॉलेज ला जाऊयात असं सांगून लगेच उठवलं.बाहेर पडल्यावर ऐश्वर्या म्हणली कॉफी प्यायला जाऊयात तिथे गेल्यावर नेहमीसारखं फोटो वगैरे काढले पण जानकी या सगळ्यामध्ये कुठेच नव्हती.जानकी सारखं सारखं ऐश्वर्या ला विचारत होती खरच तू रडलीस का? आणि ऐश्वर्या पुन्हा पुन्हा नाही नाही म्हणत होती.ऐश्वर्या च्या घरच्यांना जानकी काही फारशी पसंत नव्हती त्यामुळे ते असं वागणार यामध्ये काही नवीन नव्हतं,पण ऐश्वर्या पण त्यांना सामील आहे हे बघून जानकी ला फार वाईट वाटलं.
आणि यामुळे जानकी अजून चिडली आणि नाराज झाली.ऐश्वर्या ला जानकी च्या वागण्यातील फरक दिसत होता,म्हणून रात्री आरामात ऐश्वर्या ने जानकी ला मेसेज केला.आणि काय झालं?चिडली आहेस का?नाराज आहेस का? असे प्रश्न विचारू लागली.सुरवातीला जानकी ने मेसेज चा रिप्लाय देणे टाळले पण नंतर न राहवून चिडून जानकी बोललीच.
लगेच अविश्वास दाखवायला नको आणि समजूतदारपणा दाखवत जानकी ने पुन्हा एकदा ऐश्वर्या ला विचारलं सकाळी रडली होतीस का? आणि ऐश्वर्या ने देखील नाही म्हणून सांगितलं.त्यावर जानकी म्हणली,” माझ्या भावनांची तू अशी खिल्ली उडवशील असं मला कधीच वाटलं नव्हतं,पण असो त्यातून हे तर नक्की झालं की तू आपल्या मैत्रीचा आणि माझा एवढा गंभीरपणे विचार करत नाहीस हे मला कळलं.या पुढे खरच काही झालं आणि तू रडलीस तरी मला कधीच खरं वाटणार नाही.बर झालं जे झालं ते. TRUE FRIENDSHIP STORY
मला दुखावलं पण खरं काय आहे ते देखील समोर आलं.”
मेसेज वरच बोलता बोलता ऐश्वर्या ने जानकी ची माफी मागितली आणि पुन्हा असं होणार नाही म्हणून विश्वास दिला.आणि जानकी ला मनवल देखील.जानकी ने पण सगळ विसरून जात ऐश्वर्या ला माफ केलं आणि विषय सोडून दिला.परत दुसऱ्या दिवशी दोघी कॉलेज मध्ये भेटल्या आणि एकमेकांसोबत छान वेळ घालवू लागल्या.
आणि परत चालू झालं कॉफी प्यायला बाहेर जाणं,फिरायला जाणं.पण पुन्हा एकदा एक विषय मागेच पडला,ऐश्वर्या काहीतरी सांगणार होती जानकी ला.मग असं बाहेर फिरायला जाताना वगैरे जानकी ने एक दिवस परत ऐश्वर्या ला गोष्टीची आठवण करून दिली.आणि ऐश्वर्या च परत चालू झालं तेच तेच कारण देऊन टाळाटाळ.
जानकी ला एवढं समजल होतं की ऐश्वर्या चा तिच्यावर विश्वास नाहीये म्हणून एवढे महिने झाले तरी ऐश्वर्या आपल्याला काही सांगत नाहीये.मग एकदा जानकी ने सांगितलं आता जर तू मला काही सांगितलं नाहीस तर मी तुझ्या सोबत बोलणारच नाही. असं सांगून टाकलं आणि मग जानकी खरचं बोलायची कमी झाली.आता यावेळेस ऐश्वर्या कडे काही उपाय नव्हता त्यामुळे तिने कुठेतरी सगळ आता सांगणार आहे असं भासवून त्यातूनही काही पळवाट मिळत असेल तर शोधत होती.पण जानकी स्वतः च्या मतावर ठाम होती त्यामुळे ऐश्वर्या कडे देखील आता काही मार्ग नव्हता.
सगळ खरं खरं आणि जे आहे ते सांगावच लागणार होतं.मग एक दिवस असच कॉलेज लवकर सुटल्यावर ऐश्वर्या आणि जानकी कॉलेज मधे थांबल्या आणि खूप गप्पा मारल्या तेव्हा देखील ऐश्वर्या विषय टाळत होती पण जानकी ने अजिबात विषय सोडून दिला नाही.आणि सगळ जाणून घेतलं.आणि त्यानंतर जानकी ला ऐश्वर्या बद्दल आणखी जवळीक वाटू लागली.आपुलकी वाटू लागली.आणि जानकी ऐश्वर्या बद्दल आणखीन चांगले विचार करू लागली,ऐश्वर्या ची काळजी घेऊ लागली.पण ऐश्वर्या ला या सगळ्या काळजीची चांगुलपणाची काहीच किंमत नव्हती.ती मात्र वेळोवेळी जानकी ला दुखवायची, परत माफी मागून आपलंसं करून घ्यायची.
TRUE FRIENDSHIP STORY
जानकी नेहमी ऐश्वर्या च्या मोकळ्या वेळेनुसार,ऐश्वर्याच्या सोयीनुसार जमवून घ्यायची.पण कधी ऐश्र्वर्याकडून काही अपेक्षा केली तर त्यावेळेस ऐश्वर्या लगेच हात वर करून मोकळी व्हायची.कारण चिडलेल्या जानकी ला कसं शांत करायचं आणि मनवायच हे ऐश्वर्याला आता चांगल जमायचं.
त्या दिवशी ऐश्वर्या च्या आईचा वाढदिवस होता म्हणून ऐश्वर्या ला लवकर घरी जायचं होतं,पण आता एकट कसं जाणार म्हणून तिने जानकी ला सोबत न्यायचं ठरवलं.
जानकी ला ऐश्वर्या च्या घरी जायचं म्हणजे टेन्शन यायचं कारण तिच्या घरच्यांचा स्वभाव जानकी ला माहीत होता,आणि तिथे जायला नको वाटायचं म्हणून ती ऐश्वर्या ला नकारच देत होती,आणि जानकी ला मनात शंका होतीच की ऐश्वर्या च्या घरी आपल्याला बोलवलेल नसणार ऐश्वर्या खोटं बोलत आहे,पण तरी ऐश्वर्या सोबत जानकी गेली.
घरी ऐश्वर्या आणि तिच्या बहिणीने मिळून अगोदरच केक आणून ठेवला होता.सगळ्यांनी मिळून छान गाणं म्हणलं आणि ऐश्वर्या च्या आईने केक कट केला.आता सगळ्यांना केक वाटायचा होता.ऐश्वर्या च्या आईने किचन मधून छोट्या प्लेट्स आणल्या केक साठी आणि मग एक एक पिस त्यात ठेवला.
सगळ्यात अगोदर ऐश्वर्या चे वडील मग आजी,त्यानंतर ऐश्वर्या ची बहिण मग ऐश्वर्या त्यानंतर बहिणीसोबत आलेली तिची मैत्रीण आणि मग सर्वात शेवटी जानकी अशा प्रकारे केक वाटण्यात आला.जानकी ला लक्षात आलं हे मुद्दाम केलं गेलं आहे,ऐश्वर्या कडे बघितलं तर ऐश्वर्या ने कळून पण न समजल्यासारख केलं.
अनेकदा अशा गोष्टी झाल्या की जानकी ऐश्वर्या वरील प्रेम,मैत्री यासाठी ऐश्वर्या च्या घरी जायची पण अपमानित होऊन यायची.आणि त्यावर ऐश्वर्या काहीच बोलायची नाही.
एकदा असच आवडीने ऐश्वर्या साठी तिच्या बहिणीसाठी जानकी ने छान असं ब्रेसलेट बनवून नेलं तर त्या ब्रेसलेट ची सोनेरी रंगाची साखळी बघून ऐश्वर्या च्या आजीला प्रश्न पडला की सोन्याचं आहे का काय? साधी गोष्ट आहे ऐश्वर्या आणि जानकी एकाच कॉलेज मधल्या एकत्र शिकणाऱ्या मग अशा वयात सोन्याचं काही खरेदी करणे जानकी ला कसं काय शक्य असेल?
TRUE FRIENDSHIP STORY
माहीत नाही जानकी मध्ये एवढा समजूतदारपणा कसा काय होता,कसं काय एखादा माणूस एवढ्या गोष्टी कळून पण दुर्लक्ष करू शकतो.एखाद्यावर एवढं प्रेम करू शकतो मनात काही पण राग न ठेवता प्रत्येक वेळेस नव्याने सर्वात करू शकतो. एवढा जीव लावावा का कोणाला? असे अनेक प्रश्न आहेत जानकी ला पडतील का हे प्रश्न याबद्दल एक मोठा प्रश्न आहे.
अशा प्रकारे रुसत,भांडत कॉलेजचं शेवटचं वर्ष देखील संपले,ऐश्वर्या आणि जानकी ची मैत्री अशीच टिकेल का याबद्दल जानकी ला शंका होती,कारण ऐश्वर्या कडून कधीच काही प्रयत्न दिसले नव्हते.कॉलेज नंतर जानकी आणि ऐश्वर्या चे काही दिवस न चुकता रोज बोलणे व्हायचे.नंतर काही दिवसांनी ऐश्वर्या कडे गोड बातमी होती,ही गोष्ट पण ऐश्वर्या ने न सांगता पण जानकी ने फक्त रोजच्या फोन वरच्या गप्पांमधून ओळखले होते.
फक्त ती ऐश्वर्या ने सांगायची वाट बघत होती.पण ऐश्वर्या मात्र बाहेरच्या कोणाला एवढ्यात सांगायचं नाही वगैरे या गोष्टी पाळत होती.जानकी पण बाहेरच्या लोकांमध्ये होती.कारण जानकी ला तिने कधी स्वतःचं जवळचं समजलच नव्हतं,जानकी ला राग आला होता पण आता या अशा वेळेस ऐश्वर्या वर काय रागवायचे एवढी छान गोष्ट ऐश्वर्या अनुभवत होती आपण पण या आनंदात ऐश्वर्या सोबत सामील व्हायला पाहिजे,ऐश्वर्या ला आपल्या मैत्रीतून आनंदी,निरोगी ठेवलं पाहिजे अशी जबाबदारीची भावना जानकी मध्ये होती.
तीन महिने झाल्यानंतर ऐश्वर्या ने जानकी ला पण ही गोष्ट सांगितली.आणि जानकी ने देखील नव्याने या गोष्टीचे स्वागत केले.मग आता फोन वरच्या गप्पांनी दुसरा विषय निवडला होता.ऐश्वर्या ची फोन वर रोज विचारपूस करणे,बाळाचं नाव काय ठेवणार,मुलगा की मुलगी, जुळे झाले तर अशा खूप साऱ्या गमती जमती चालायच्या.
अशातच एक दिवस ऐश्वर्याच्या घरी एक कार्यक्रम होता,त्यासाठी ऐश्वर्या ने जानकी ला आणि जानकी च्या आई ला बोलवले.आता पर्यंत आलेल्या अनुभवामुळे आणि खूप दिवस ऐश्वर्या सोबत प्रत्यक्षात भेटणे,बोलणे न झाल्यामुळे जानकी चे मन ऐश्वर्या च्या घरी कार्यक्रमासाठी जाण्यासाठी साशंक होते.घरून निघताना पण खूप हळूहळू,विचार करत वगैरे चालली होती.एकदा जानकी चे विचार ऐकून जानकी च्या आईने जानकी ला विचारले देखील नक्की जायचं आहे की नाही? तुला नको वाटत असेल तर नको जायला.
पण ऐश्वर्या ला दुखवायला नको,ऐश्वर्या ला काय वाटेल या विचाराने जानकी ने कार्यक्रमात जाण्याचा निर्णय घेतला.कार्यक्रमात गेल्यावर पण जानकी ला खूप वेगळीच गोष्ट सतावत होती.कोणी ओळखीचं नव्हत काय नव्हत आणि एकदम चुकल्यासारखं वाटत होतं.अचानक ऐश्वर्या चे आई बाबा समोर आले आणि जानकी च्या पोटात गोळाच आला की आता काय होईल? पण तरीसुद्धा जानकी एकदम मनमोकळे पणाने चेहऱ्यावर काहीही भाव येऊ न देता त्यांच्या कडे बघून छान हसली.आणि बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात ऐश्वर्याच्या वडिलांनी विचारलेल्या प्रश्नामुळे जानकी एकदम निरुत्तर झाली.
TRUE FRIENDSHIP STORY
आणि आजपर्यंत ऐश्वर्या सोबत असलेली मैत्री हे फक्त एक खूप मोठं खोटं होतं ज्यामध्ये जानकी जगत होती याची जानकी ला जाणीव झाली.तिथे थांबण्याची देखील इच्छा जानकी ला होत नव्हती.आणि लवकर निरोप घेऊन निघणार तेवढ्यात ऐश्वर्या च्या घरच्यांनी खूप आग्रह करून थांबवलं कसं बस कार्यक्रम उरकला आणि जानकी निघाली आणि परत जानकी ने कधीच ऐश्वर्या ला फोन किंवा मेसेज केला नाही.
जानकी थकली होती,मनाने,विचाराने ऐश्वर्या ला समजून घेत,ऐश्वर्या नुसार जुळवून घेत.अजून किती समजून घ्यायचं असा विचार जानकी ने केला.
कधी अधून मधून जानकी ला ऐश्वर्या ची आठवण झालीच तर ऐश्वर्या सोबत घालवलेल्या सुंदर क्षणांपेक्षा,आठवणींपेक्षा ऐश्वर्या सोबतच्या मैत्रीने काय शिकवलं,जीवनाची काय शिकवण मिळाली हाच धडा आठवतो.जानकी ला समजल एखाद्यावर प्रेम करणं,जीव लावणे चूक नाही,पण नात्यामध्ये स्वतःला विसरून जाणे,स्वतःचा अजिबात विचार न करणे,स्वतः अगोदर समोरच्याला ठेवणे हे चूक आहे.आणि कदाचित या मुळेच जानकी ला आता ऐश्वर्या बद्दल तेवढी जवळीक,आपुलकी वाटत नाही.
वाचक रसिक कशी वाटली जानकी आणि ऐश्वर्या ची गोष्ट.
तुम्ही काही शिकलात का? या गोष्टीतून आणि गोष्टीने तुम्हाला नक्कीच खिळून ठेवले असतील अशी आम्ही आशा करतो.
लवकरच भेटुयात एका नवीन गोष्टी सोबत तोपर्यंत खूश राहा,आनंदी राहा,वाचत राहा,आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर काम करत राहा.
धन्यवाद!!!
TRUE FRIENDSHIP STORY या गोष्टीचा भाग एक इथे वाचा